Posts

Showing posts from April, 2021

स्कॉटलंड, इंग्लंड आणि बरंच काही

Image
लहानपणापासून इंग्लंड, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन, युनाइटेड किंग्डम वगैरे सर्व एकच आहे अशी समजूत होती. त्यातच कुठेतरी स्कॉटलंड येतं, ज्यांची वर्ल्ड कपसाठी कधीच क्वालिफाय न होणारी क्रिकेट टीम आहे. आणि “स्कॉटलंड यार्ड" नावाचं एक जगप्रसिद्ध पोलीस खातं त्यांच्याकडे आहे. असे माझे खुपसारे गैरसमज होते. तिथे गेल्यावर समजलं की प्रत्यक्षात हे सगळं वेगळं आहे. इंग्लंड =  इंग्लंड इंग्लंड + वेल्स = ब्रिटन इंग्लड + वेल्स + स्कॉटलंड = ग्रेट ब्रिटन इंग्लड + वेल्स + स्कॉटलंड + उत्तर आयर्लंड = युनाइटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयर्लंड, अर्थात युनाइटेड किंग्डम किंवा युके हे सर्व गणित मला तिथे गेल्यावरच कळलं. तिथेच हे ही कळलं की स्कॉटलंड यार्डचा आणि स्कॉटलंडचा काहीएक संबंध नाही. स्कॉटलंड यार्ड हे तर लंडन उपनगरातील पोलिसांचं मुख्यालय आहे. त्याचा मुख्य दरवाजा “ग्रेट स्कॉटलंड यार्ड” नावाच्या रस्त्यावर आहे म्हणून त्याला हे नाव पडलं. युकेचे हे चार प्रांत खरोखरच खूप वेगळे आहेत. स्कॉटलंडला गेल्यावरच मला शोध लागला की त्यांची स्वतंत्र पार्लमेंट आहे. अर्थात एडिंबरा शहरात असलेली ही   पार्लमे...

बॅगपायपर्सचे स्कॉटलंड - नूतन वर्षाभिनंदन

Image
माझं ऑफिस ग्लासगो शहराच्या मध्यभागी होतं. शहराचा हा मुख्य भाग तसा लहानसाच. सर्व मुख्य ट्रेन स्टेशन्स, बस स्टॉप्स, दुकानं, मॉल्स वगैरे ऑफिसपासून अगदी चालत जाण्याइतकी जवळ. या शहराच्या मुख्य भागाची खासियत म्हणजे सर्व रस्ते काटकोनात आहेत. बाकी उपनगर या मुख्य सिटी सेंटरपासून चहुबाजूनी   पसरलेलं. जिथे मी घर भाड्यानी घेतलं होतं ते ग्लासगोच्या हद्दीतील पश्चिमेकडील टोक. मुख्य शहरापासून जरासा दूर आणि त्यामुळे शांत असा हा भाग. शहराचा   मुख्य भाग वगळता बाकी सगळीकडे मुख्यत्वे लहान विलग घर, रो हाउसेस किंवा २-३ मजली इमारतीच आहेत. ॲनिसलँडमध्ये मात्र ह्या सर्व लहान बिल्डींग्समधून डोकं वर काढणारी एक २५ मजली सरकारी योजनेतील घरांची इमारत आहे. तिथे खूप साऱ्या इमारती ह्या ४०-५० वर्ष जुन्या आहेत. काही काही तर शंभर वर्ष जुन्यादेखील आहेत. ह्या सर्व एकदम व्यवस्थित राहत्या इमारती आहेत. सर्व जरुरी कागदपत्रांची पूर्तता करून ठरल्याप्रमाणे मी शुक्रवारी रात्रीची बस पकडून शनिवारी पहाटे सॉलिहलच्या घरी परतलो. आता पुढचं मोठं काम होतं रहातं घर खाली करून, साफसूफ करून सामानासहित ७ दिवसात ग्लासगोला स्थलांतरित हो...

बॅगपायपर्सचे स्कॉटलंड - चुकामुक

Image
  २. चुकामुक संपूर्ण स्कॉटलंड हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे कोणत्याही शहरात, गावात कुठेही गेलात तरी वर - खाली रस्ते हे निश्चित दिसणार. ग्लासगोही त्याला अपवाद नाही. त्यामुळे बुकॅनन बस स्थानकापासून हॉटेल पर्यंतचा १० - १५ मिनिटाचा रस्तासुद्धा चढ-उतार पार करत जाता जाता खूप मोठा वाटला. माझ्यानंतर काही महिन्यांनी माझ्या प्रोजेक्टमध्ये एक जण आला. पुढे आमची खूप छान मैत्री झाली आणि त्याच्याकडून मला हा किस्सा समजला. दिल्लीच्या “सुखवस्तू” कुटुंबातील हा सुमारे १०० किलोचा मनुष्य बरोबर १०० किलोचं सामान घेऊन प्रथम ग्लासगोत दाखल झाला आणि हीच चढण चढू लागला. प्रथम त्याच्या बॅगेच्या चाकांनी आणि मग काही मिनिटातच त्यानी हाय खाल्ली. शेवटी सकाळी सकाळी आमचा आणखी एक मित्र मदतीला धावून गेला आणि त्यानी ते २०० किलो कसेबसे पैलतीरी पोहोचवले. पुढे त्याच्या आयुष्यात कितीही उतार चढाव आले तरी ही चढण त्याला कायमची लक्षात राहून गेली. मी मात्र बरोबर आणलेली लहानशीच बॅग घेऊन आरामात हॉटेलमध्ये दाखल झालो. ग्लासगोमध्ये असलेल्या अनेक पुरातन इमारतींपैकी ही एक जिचं रूपांतर छोटेखानी हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. हॉटेल म्हण...

बॅगपायपर्सचे स्कॉटलंड - खोळंबा

Image
१. खोळंबा फेब्रुवारी २०१८ चे शेवटचे दिवस होते. नोकरीनिमित्त मी बर्मिंगहॅम जवळच्या सॉलिहल येथे रहात होतो आणि आता दुसऱ्या क्लायंटसाठी काम करायच असल्यामुळे मी ग्लासगोला, स्कॉटलंडमधील दोनपैकी एका मोठ्या शहरात जाणार होतो. १ मार्चपासून तिथे रुजू व्हायच होत. प्रवासाची व्यवस्था, तिथे एका आठवड्यासाठी लहानग्या हॉटेलमध्ये सोय, सामानाची बांधाबांध वगैरे सर्व तयारी जय्यत होती. प्रथम मी तिथे जाऊन भाड्याच्या घराचा शोध घेणार होतो आणि मग मुलीला व बायकोला घेऊन बाडबिस्तरा हलवणार होतो. ह्या सर्व उठाठेवीसाठी माझ्याकडे फक्त १८ दिवस होते कारण मला माझं रहातं घर खाली करायच होतं. आणि सर्वकाही आलबेल चालू असतानाच रशियाकडून संकट आलं. नाही नाही, रशियाचा त्यात काही दोष नव्हता. म्हणजे पश्चिम युरोपात प्रत्येक समस्येत रशियाचा “हात” शोधायचा प्रघात असला तरी हि आपत्ती मात्र नैसर्गिक होती. “बिस्ट फ्रॉम ईस्ट" नावानी प्रसिद्धीस आलेलं वादळ संपूर्ण युरोपात हिमवृष्टी घेऊन आलं. युकेमध्ये कधी नव्हेतर इतकं बर्फ पडलं की सर्वकाही ठप्प. स्कॉटलंडचा इंग्लंडशी संपर्क पूर्णपणे तुटलेला. हवेतून किंवा जमिनीवरून, कोणत्याही प्रकारे इथ...