Posts

न खाणारा ते खाणारा

Image
डिस्क्लेमर: मी खाणारे किंवा न खाणारे कोणाच्याही बाजूचा नाही. मी मानतो की ह्या बाबत प्रत्येकाचं मत हे वैयक्तिक आहे आणि सर्वांच्या  मतांचा मी समान आदर करतो. पुढील लिखाणाचा विनोद निर्मिती (जमल्यास) इतकाच हेतू आहे. तेंव्हा भावना वगैरे दुखावून घेऊ नका.  खूप नाजूक विषय आहे म्हणून सुरुवात डिस्क्लेमरनी. असो, तर मी न खाणाऱ्यांमध्ये जन्मलो. आता ते काही आपल्या हातात नसतं. मात्र ते बदलणं आपल्या हातात असतं. तसं करावंसं वाटलं म्हणून मी केलं. आता न खाणाऱ्यांमध्ये म्हणजे घरात अगदीच काही सगळे सोवळे होते अशातला भाग नाही. किंबहुना वडील मर्चंट नेव्हीत नोकरी करत असल्याने त्यांनी आयुष्यातला बराच काळ “खाणारे" म्हणून व्यतीत केला. आणि त्यानंतर ते “न खाणाऱ्यांच्यात" परतले होते. पण मुख्य माझ्या खाण्यापिण्याच्या   सवयींवर प्रभाव टाकणारी अर्थातच माझी आई ही ११० टक्के “न खाणाऱ्यांमधली” आहे.   वरचे १० टक्के यासाठी की   ती बरेचसे दुग्धजन्य पदार्थही खात नाही. त्यामुळे स्वाभाविकच मी “न खाणाऱ्यांमध्ये" पडलो. अंड लहानपणापासून खातोय. पण अंड   खाणाऱ्याला खाणारे आणि न खाणारे दोघेही त्यांच्यात...

आतिषबाजी

Image
“रात्र मोठी अन सोंग थोडी".  म्हण  जराशी उलटी सुलटी झाली ना. पण स्कॉटलंडला विंटरमध्ये खरोखर तसंच   होतं. ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी डे लाईट सेविंग बंद होतं. घड्याळं एका तासानी मागे सरकवली जातात आणि युके पुन्हा एकदा ग्रीनीच  मीन टाइम किंवा जी. एम. टी. वर येतं. आणि मग तेव्हापासून हळूहळू सुरुवात होते ती कंटाळवाण्या अंधाऱ्या मोठ्याच मोठ्या रात्रींची. डिसेंबर जानेवारीपर्यंत दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास काळोख होतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ साडेआठला कुठे झुंजूमुंजू होऊ लागतं.. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत बघता बघता ऋतुमान बदलून जातं. झाडांची पानं झटपट हिरव्याची पिवळी, पिवळ्याची लाल आणि लालची मातकट होऊन झाडांवरून खाली उतरतात. वाळक्या पानांचा जमिनीवर दिवसागणिक ढीग जमा होतो. तसं झालं की मग माझ्या मुलीसोबत मीपण तो पालापाचोळा पायाखाली चुरत चालायची मजा घ्यायचो. मात्र त्यात पाऊस पडला की त्याच पाचोळ्याचं रूपांतर चिखलात होतं. ऑक्टोबरमध्ये तिथे एक आगळावेगळा सण असतो तो म्हणजे हॅलोविन. भुताखेतांच्या गोष्टी, भीतीदायक वेशभूषा, भोपळ्यात कोरलेले मॉन्स्टर अशा सगळ्या गोष्टींचा हा सण. मग “...

दिवाना परवाना

Image
मे २०१८ च्या सुमारास मी आणखीन एक प्रोजेक्ट सुरु केला, तो म्हणजे ड्रायविंग शिकण्याचा. प्रोजेक्ट इतक्यासाठी कारण तिथे ड्रायविंग शिकून लायसन्स मिळवण्यासाठी भरपूर वेळ, पैसे आणि नशीब खर्ची घालावं लागतं. खरंतर माझ्याकडे गेली सुमारे १२ वर्ष भारतातलं लायसन्स होतं आणि किमान दोन वर्ष मी पुण्यात नियमितपणे माझी गाडी चालवत होतो. पण इथे गाडी चालवणं आणि पुण्यात गाडी “चालवणं" यात जमीन असमानाचा फरक आहे. आणि त्यातून लायसन्सची परीक्षा म्हणजे तर अग्निदिव्यच! तिथे मुलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या पाठोपाठ बहुदा गाडीचा नंबर लागतो. युकेमध्ये प्रत्येक घरामागे १.२ गाड्या आहेत. त्यातून स्कॉटलंडमध्ये तर मुख्य शहरं वगळता सार्वजनिक वाहतूक यथातथाच आहे. तेंव्हा स्वतःच्या वाहनाला पर्याय नाही. माझा तिथे राहण्याचा कालावधी निश्चित नसल्याने अगदी लगेच गाडी विकत घेण्याचा विचार नव्हता. पण लायसन्स काढून किमान गाडी भाड्यानी घेऊन तरी कुठेतरी फिरत येईल अशी अपेक्षा होती. गाडी न घेण्याचा निर्णय हा योग्यच ठरला. पुढे कोव्हिडच्या काळात जेंव्हा अचानक मायदेशी परतावं लागलं तेंव्हा त्याचा प्रत्यय आला. त्यातून तिथे ...

स्कॉटीश लॉक्स

Image
युकेला जी काही चार वर्ष मी होतो त्यात आवर्जून एक गोष्ट केली ती म्हणजे दर वर्षी भारतभेट. कामानिमित्त कुठेही गेलो तरी मन आपल्या मातीत, आपल्या माणसांतच अडकलेलं असतं ना! २०१८ च्या मेपर्यंत आम्हाला मायदेशी जाऊन आल्याला आठ एक महिने झाले होते. तेंव्हा मन पुढच्या भेटीची वाट बघू लागलं होतं. मात्र मी ग्लासगोच्या ह्या प्रोजेक्टमध्ये नवीनच रुजू झालो होतो. लगेच मोठी सुट्टी घेणं शक्य नव्हतं. माझ्या बायकोची एक कॉलेजमधली मैत्रीण, श्रुती ग्लासगोतच राहते. तेंव्हा तिच्यासोबत बायको आणि मुलगी जाऊन येतील असं ठरलं. लगेच तिकिटं  काढली, बॅगा  भरल्या आणि त्या दोघी निघायला सज्ज झाल्या. अर्थातच माझ्यासाठी त्यांना एअरपोर्टवर बाय करणं तितकंसं  सोपं नव्हतं. त्यांना सोडून मी ऑफिसला गेलो तेंव्हा ऑफिसमधील एका अनुभवी मित्रानी समजावलं की पहिले काही दिवस मुलीची खूप आठवण येईल. मग दोन चार दिवस बायकोची आठवण येईल. मग मात्र सगळं नॉर्मल वाटू लागेल. आणि झालंही अगदी तसंच. त्या एकटेपणाच्या दिवसांमध्ये मी जरा नित्यनेमानी चालायला जाऊ लागलो. ग्रेट वेस्टर्न रोड हा माझ्या घराजवळचा मोठा हायवे. त्या रस्त्यालगत दुतर्फा अ...

ग्लासगो भ्रमण – पश्चिमार्ध

Image
जगातील बहुतेक शहरांमध्ये जशी एक मुख्य नदी असते तशीच ग्लासगोची पण क्लाईड नदी आहे . एकेकाळी ग्लासगो शहराची भरभराट याच नदीमुळे झाली होती . स्कॉटलंडचा जगभराशी , प्रामुख्याने युरोपशी व्यापार याच नदीतून चालायचा . ग्लासगो हे जगातील जहाज बांधणीचे एक प्रमुख केंद्र होते . अर्थातच ते सुद्धा क्लाईड नदीकाठी असलेल्या शिपयार्ड मुळेच . अशी ही ग्लासगो ची जीवनदायिनी शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते . याच नदीलगत असलेल्या रस्त्याने मार्गक्रमण करत आम्ही शहराच्या पश्चिमार्धात प्रवेश केला . स्कॉटलंडमध्ये आणि खासकरून ग्लासगोमध्ये पाण्याइतकच (  काहींसाठी कदाचित थोड ं जास्तच  ) महत्व ज्या द्रव्याला आहे ते म्हणजे स्कॉच व्हिस्की . स्कॉटलंडला बरच द्रव्य ( पैसा ) मिळवून देणारं हे द्रव्य . त्याच्या उत्पादनाचं ग्लासगोतील एक मुख्य ठिकाण म्हणजे क्लाईड डिस्टीलिअरी. आम्ही ती बाहेरूनच ओझरती पाहून पुढे गेलो. तिथून जरासं पुढे गेलं की स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस अर्थात एस इ  सी लागतं. इथे एकूण तीन वास्तू दिसतात.  एस इ सी सेंटर   ही त्रिकोणाकृती प्रवेशद्वार असलेली सर्वात प्रथम बांधली गे...

ग्लासगो भ्रमण - पूर्वार्ध

Image
थंडगार विंटर संपून स्प्रिंग सुरू झाला. बर्फाचे थर जाऊन निष्पर्ण झालेल्या झाडांना पुन्हा नव्यानी पालवी फुटू लागली. बरीचशी झाडं रंगीबेरंगी फुलांनी बहरू लागली. सगळीकडे निसर्गानी जणू कात टाकून नव्यानी   सुरुवात केली होती. आमची तर ग्लासगोमधे नवीन सुरुवात होतीच. मग ह्या नवीन शहराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एक बऱ्यापैकी निरभ्र असा रविवार निवडून आम्ही सिटी टूर करायला निघालो. ग्लासगो शहराच्या मध्यभागी असलेल्या जॉर्ज स्क्वेअरपासून ही टूर सुरु होते. शहरातील अशा मुख्य स्क्वेअर्समध्ये असतात तसे इथेही ८ पुतळे आहेत. यापैकी मला परिचित एकच होता तो म्हणजे वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॉटचा. हा वैज्ञानिक ह्याच प्रांतातला होता हे मात्र मला ठाऊक नव्हतं. लहानपणापासून “चहाच्या किटलीत पाणी उकळताना पाहून त्याला ही आयडिया सुचली" एवढीच दंतकथा मला ठाऊक होती. या पुतळ्यांव्यतिरिक्त इथे पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या ग्लासगोतील सैनिकांचं स्मारकही आहे. उरलेल्या भागात मग लोकांना पसरण्यासाठी लॉन, चालण्यासाठी रस्ता आणि बसण्यासाठी बाकडी आहेत. जॉर्ज स्क्वेअरच्या चहूबाजूंनी जुन्या आलिशान इमारती आहेत. त्या...

स्कॉटलंड, इंग्लंड आणि बरंच काही

Image
लहानपणापासून इंग्लंड, ब्रिटन, ग्रेट ब्रिटन, युनाइटेड किंग्डम वगैरे सर्व एकच आहे अशी समजूत होती. त्यातच कुठेतरी स्कॉटलंड येतं, ज्यांची वर्ल्ड कपसाठी कधीच क्वालिफाय न होणारी क्रिकेट टीम आहे. आणि “स्कॉटलंड यार्ड" नावाचं एक जगप्रसिद्ध पोलीस खातं त्यांच्याकडे आहे. असे माझे खुपसारे गैरसमज होते. तिथे गेल्यावर समजलं की प्रत्यक्षात हे सगळं वेगळं आहे. इंग्लंड =  इंग्लंड इंग्लंड + वेल्स = ब्रिटन इंग्लड + वेल्स + स्कॉटलंड = ग्रेट ब्रिटन इंग्लड + वेल्स + स्कॉटलंड + उत्तर आयर्लंड = युनाइटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्थन आयर्लंड, अर्थात युनाइटेड किंग्डम किंवा युके हे सर्व गणित मला तिथे गेल्यावरच कळलं. तिथेच हे ही कळलं की स्कॉटलंड यार्डचा आणि स्कॉटलंडचा काहीएक संबंध नाही. स्कॉटलंड यार्ड हे तर लंडन उपनगरातील पोलिसांचं मुख्यालय आहे. त्याचा मुख्य दरवाजा “ग्रेट स्कॉटलंड यार्ड” नावाच्या रस्त्यावर आहे म्हणून त्याला हे नाव पडलं. युकेचे हे चार प्रांत खरोखरच खूप वेगळे आहेत. स्कॉटलंडला गेल्यावरच मला शोध लागला की त्यांची स्वतंत्र पार्लमेंट आहे. अर्थात एडिंबरा शहरात असलेली ही   पार्लमे...