Posts

Showing posts from December, 2022

न खाणारा ते खाणारा

Image
डिस्क्लेमर: मी खाणारे किंवा न खाणारे कोणाच्याही बाजूचा नाही. मी मानतो की ह्या बाबत प्रत्येकाचं मत हे वैयक्तिक आहे आणि सर्वांच्या  मतांचा मी समान आदर करतो. पुढील लिखाणाचा विनोद निर्मिती (जमल्यास) इतकाच हेतू आहे. तेंव्हा भावना वगैरे दुखावून घेऊ नका.  खूप नाजूक विषय आहे म्हणून सुरुवात डिस्क्लेमरनी. असो, तर मी न खाणाऱ्यांमध्ये जन्मलो. आता ते काही आपल्या हातात नसतं. मात्र ते बदलणं आपल्या हातात असतं. तसं करावंसं वाटलं म्हणून मी केलं. आता न खाणाऱ्यांमध्ये म्हणजे घरात अगदीच काही सगळे सोवळे होते अशातला भाग नाही. किंबहुना वडील मर्चंट नेव्हीत नोकरी करत असल्याने त्यांनी आयुष्यातला बराच काळ “खाणारे" म्हणून व्यतीत केला. आणि त्यानंतर ते “न खाणाऱ्यांच्यात" परतले होते. पण मुख्य माझ्या खाण्यापिण्याच्या   सवयींवर प्रभाव टाकणारी अर्थातच माझी आई ही ११० टक्के “न खाणाऱ्यांमधली” आहे.   वरचे १० टक्के यासाठी की   ती बरेचसे दुग्धजन्य पदार्थही खात नाही. त्यामुळे स्वाभाविकच मी “न खाणाऱ्यांमध्ये" पडलो. अंड लहानपणापासून खातोय. पण अंड   खाणाऱ्याला खाणारे आणि न खाणारे दोघेही त्यांच्यात...