Posts

Showing posts from August, 2021

आतिषबाजी

Image
“रात्र मोठी अन सोंग थोडी".  म्हण  जराशी उलटी सुलटी झाली ना. पण स्कॉटलंडला विंटरमध्ये खरोखर तसंच   होतं. ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी डे लाईट सेविंग बंद होतं. घड्याळं एका तासानी मागे सरकवली जातात आणि युके पुन्हा एकदा ग्रीनीच  मीन टाइम किंवा जी. एम. टी. वर येतं. आणि मग तेव्हापासून हळूहळू सुरुवात होते ती कंटाळवाण्या अंधाऱ्या मोठ्याच मोठ्या रात्रींची. डिसेंबर जानेवारीपर्यंत दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास काळोख होतो तो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ साडेआठला कुठे झुंजूमुंजू होऊ लागतं.. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत बघता बघता ऋतुमान बदलून जातं. झाडांची पानं झटपट हिरव्याची पिवळी, पिवळ्याची लाल आणि लालची मातकट होऊन झाडांवरून खाली उतरतात. वाळक्या पानांचा जमिनीवर दिवसागणिक ढीग जमा होतो. तसं झालं की मग माझ्या मुलीसोबत मीपण तो पालापाचोळा पायाखाली चुरत चालायची मजा घ्यायचो. मात्र त्यात पाऊस पडला की त्याच पाचोळ्याचं रूपांतर चिखलात होतं. ऑक्टोबरमध्ये तिथे एक आगळावेगळा सण असतो तो म्हणजे हॅलोविन. भुताखेतांच्या गोष्टी, भीतीदायक वेशभूषा, भोपळ्यात कोरलेले मॉन्स्टर अशा सगळ्या गोष्टींचा हा सण. मग “...